Wednesday, 5 January 2011

बघा काय Adjust हुतंय का ????

                         आमच 'दादया' म्हणजे रांगडा गडी. वारणेकाठच्या गावातला. घरची बक्कळ शेती, टेन्शन म्हणून कसलं ते नाही. त्यामुळं रिवाजाप्रमाण बारावीतच निवांत ३-४ वर्षे काढल्यावर दादयान तिथच 'सावकरांच्या' कॉलेजवर B.Sc. ला एडमिशन घेतलं. Extra करिक्युलर activities मधून वेळ मिळत नसल्यामुळे बरोबरीची पोर B.Sc. होऊन बाहेर पडली तरी 'दादया' अजून सेकंड इयरलाच होता.
                       'दादया' आणि 'दादयाचा' एक जिगरी दोस्त; आता जिगरी एवढा कि दोघबी एकाच पोरीवर मरायचे, आणि हे दोघानाबी माहित असल्यामुळं दोघबी तिच्यावर टप्पे टाकायचं काम अगदी इज्जातीत एकत्रच करायचे. पण दादयाचा दोस्त याबाबतीत दादयाला  जरा भारी पडायचा, कधी कधी तिच्याकडे नोटस्‌ मागायचा, कधी ती व्हरांड्यातन जात असली तर तिला प्रक्टिकल कधी आहे म्हणून विचारायचा. दादया आपला उगीचच मित्राच्या माग माग करायाचा. अशातच पहिली सेमिस्टर झाली.
                दादया सकाळच्या पारी घरच्या म्हशी हिंडवून धुऊन घरी घेऊन यायचा, त्याचं चारा पाणी झाल कि दादया कडक इस्त्रीची कापड (चौकडा बिन इनशर्ट केलेला शर्ट आणि करड्या रंगाशी जुळणारी प्यांट) आणि पायात पायताण घालून नियमितपणे कॉलेजात जायचा.
                     एक दिवस दादया असाच कॉलेजच्या व्हरांड्यात उभा होता, तेला लांबन तेचा दोस्त येताना दिसला, दादयाला विचार पडला कडवं आज अगदी कट्टात आलंय; दिवाळीची जीन-बिन घालून; भानगड तरी काय हाय?
                       जवळ आला तसा दोस्तानच सस्पेन्स फोडला म्हणला दादया आज विचारतोच; निकालच लावून टाकू तेच्या आयला, दादया आपला कसनुसं हसला. बोलत बोलत जोडी चा च्या गाड्यावर पोचली. चा पिता पिता प्लांनिग फिक्स केल आणि दोन हाफ चे पैसे कॉमन अकौंटवर मांडायला सांगून, दादया आणि तेचा दोस्त गाडीची व्यवस्था करायला बाहेर पडले.
                   उनात फिरून फिरून घाम फुटला पण गाडी काय मिळना, इतक्यात वारणा कारखान्यावर कामाला असणारा एक गावकरी दादयाला भेटला, तेला आपली कायतरी थाप मारून दादयान तेची गाडी दोन तासासाठी मागून घेतली.
                    आता शेवटच लेक्चर संपायची वेळ आली होती आणि आज बाकी काहीच नसल्यामुळ ती दोन वाजताच बाहेर पडणार होती, हे त्यांना माहित होत. दोघबी लगबगीन ठरलेल्या स्पॉट वर जाऊन थांबले.
                    कॉलेजच्या पाठीमाग भलं मोठं ग्राउंड, कॉलेजमधून निघणारा रस्ता त्या ग्राउंडला वळसा घालून पाठीमागच्या कॉलनीत जायचा, दुपारच्या वेळी रस्त्यावर कुणी नसायच त्यामुळं जोडीन मुहूर्त साधायच ठरवलं.
                     दोघबी गाडी रस्त्याकडला लाऊन पोरीच्या येण्याची वाट बघत उभे राहिले. पण टेन्शनमूळ जिगरीच अंग थंड पडू लागलं होत, तेवढ्यात लांबून ती एकटीच येताना दिसली, तीनबी या जोडीला बघितली तशी पोरगी सटपाटली, आयंशीच्या स्पीडन चालू लागली. आता काहीतरी हालचाल करण गरजेच होत. दादयान मित्राला रस्त्यावर ढकललं, तसा त्योबी धीर धरून तिच्या दिशेन चार पावलं पुढ गेला आणि नाव घेऊन डायरेक्ट प्रश्न केला रीस्पोन्स देणार का नाही? पोरगी गोंधळून तशीच उभी... दोस्तान परत तोच प्रश्न केला, तशी पोरगी सावध झाली; म्हणाली मी एगेज आहे.
                   आता या उत्तरावर दादयाच्या दोस्ताची जीभ टाळूलाच चिकटली, काय बोलाव सूचना...
                    डाव काय जमना असं दिसल्यावर इतकावेळ गाडीची राखण करत उभा असलेला आपला दादया दोस्ताच्या मदतीला धावला. दोन ढेंगात रस्ता पार करून पोरीच्या समोर जाऊन उभा राहिला आणि म्हणाला बघा कि जरा काय Adjust हुतय का ? पोरीन डोक्यावर हात मारला.
                   आता तुम्हीच सांगा मंडळी... त्या बिचाऱ्या पोरीन कुणा कुणाला आणि कस कस Adjust करायच???
 (ही एक संपूर्ण सत्य कथा आहे. मध्यंतरी या थीमवर एक sms पहिला म्हणून म्हटल खरोखरच काय घडल ते स्पष्टच  सांगाव)  

7 comments:

 1. Prashant Bhosale6 January 2011 at 01:08

  wah wah YUVRAJE....Blog chanch ahe ki

  ReplyDelete
 2. vaishali nandavadekar10 January 2011 at 18:46

  lai bhari ..... kolhapurla jaun aalyagat vatal rav... good keep it up

  ReplyDelete
 3. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 4. great...chyayala amchya gavakada bi asach asatay.... :-)
  thodifar bhasha ani bolaychi paddhat badalate...baki sagala sarakhach

  ReplyDelete
 5. bhava chalu rhaunde asach.........

  ReplyDelete
 6. jamtaya vatat.
  nahi tar aaplya kada iDEA.... kaya kami hayat?

  ReplyDelete
 7. मस्त ....adjust केलयसा ...
  छान,ऊत्तम....

  ReplyDelete