Thursday, 6 January 2011

या सगळ्यांच पुढे होत तरी काय???

            परवा संध्याकाळच्या वेळी असच काहीतरी खाव म्हणून कृष्ण व्हेज कोर्टच्या शेजारच्या रगडा पुरीवाल्या कडे गेलो. बऱ्यापैकी गर्दी होती, त्यामुळे मी आपला ऑर्डर देऊन साइडला जाऊन थांबलो. आता विमाननगर सारखा एरीया, त्यात संध्याकाळची वेळ त्यामुळे वातावरणाला शोभेलशी रंगीबेरंगी हिरवळ आजू-बाजूला जमली होती. तेवढ्यात एक स्कूटी माझ्या शेजारी येऊन थांबली. पाठीमागच्या सीटवर एक खुपच सुंदर षोडशवर्षीय तरुणी बसली होती, पुढेदेखील बऱ्यापैकी दिसणारी त्याच वयातली (साहजिकच माझ आपल उगीचच निरीक्षण चालू झाल); तितक्यात मागून एक हंक बाईक वरून आला, फ्रेंचकट टाईप हनुवटीवरची दाढी आणि कमरेवरून पार खाली पर्यंत घसरलेल्या जीनवर कसबसा इन केलेला शर्ट असा टिपिकल युनिफॉर्म. गाडी थांबवन्याआधीच त्याने पुढच्या मुलीच्या हातावर टाळी देऊन आनंद व्यक्त केला, ती देखील त्याला रिस्पॉन्स म्हणून इंग्लिश मध्ये अशी काहीतरी किंचाळली कि आजू-बाजूच्या २-४ जणांनी कुणाला कुत्र चावल? म्हणून माना वळवून पाहिलं मी मनात म्हटलं जमलेल दिसतंय.
        आता त्या दोन मुली आणि तो हंक तिघही पाणी-पुरी ची ऑर्डर देऊन माझ्याशेजारीच उभे राहिले. काहीतरी चालू होती अशीच आपली चिवचिव ; माझी ऑर्डर आली म्हणून मी प्लेट घेऊन तिथेच उभा राहिलो, हे तिघेजण पाणीपुरी खाण्यासाठी पुढे सरसावले, टपरीवाल्याने एक एक पुरी द्यायला सुरवात केली. पण मंडळी माझा नेम सपशेल चुकला त्या हंकच फ्रंटसीटवाली बरोबर नव्हे तर चक्क मागच्या षोडशवर्षीय तरुणी बरोबरच जमलेलं होत. आता तस समजण्याच कारण म्हणजे ते दोघेही एकाच द्रोणात पाणीपुरी खात होते (I hope काही लोकांना द्रोण हा शब्द माहिती असावा; आमच्या गावकड लग्नाच्या पंक्तीत आमटी वाढायला हाच पळसाच्या पानांचा द्रोण असायचा) इतकच नव्हे तर एकमेकाला फार प्रेमाने एक-एक पुरी अगदी प्रेमाने भरवत होते. आणि त्यांची ती कॉमन फ्रेंड का कोण होती ती हा सोहळा अत्यंत कौतुकाने अगदी डोळे भरून पाहत होती.
       तीला पाणीपुरी भरवता भरवता तिच्या चेहऱ्यावर आलेले तिचे केस त्याने अलगद बाजूला केले, आणि... आणि तिच्या कपाळाच एक ओझरत चुंबन घेतल. आता मात्र अगदी हद्द झाली; मीच आपला लाजून गोरा मोरा झालो, पण हे दोघे प्रेमवीर सगळ जग विसरून एकमेकाच्या प्रेमात अगदी आकंठ बुडालेले होते. आणि त्यांची ती कॉमन फ्रेंड अगदी आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे भाव चेहऱ्यावर आणून त्यांच्याकडे पाहत होती. अर्थात यात मला लाजण्यासारख काहीच न्हवत; पण दिवसाढवळ्या भर चौकात असं म्हणजे......??? पण या बहाद्दरांना त्याच काय ? म्हणतात ना करणाऱ्याला लाज का बघणाऱ्याला....?   
               त्यामुळ मीच आता  माझा angle बदलून उभा राहिलो; पण परत तेच, इकडे तिकडे बघता बघता माझी नजर परत एका त्रिकुटावर पडली; इथे पण तेच दोन मुली अन एक मुलगा पण दिसताना मराठीच वाटत होते. तो मुलगा पाणी प्यायला म्हणून जरा बाजूला गेला तेवढ्यात एकीन (जीन जीन्स घातली होती) दुसरीला (हि चष्मिश) विचारल हा लगेच चिडतो का ग? तीन आपल लाजून अगदी तिच्या कानाजवळ जाऊन काहीतरी सांगितलं, तो मुलगा तेवढ्यात परत आला. जीनवालीन त्याच्याकड उगीचच हसून बघितलं आणि म्हणाली तुझी कोणी गर्लफ्रेंड वगैरे आहे का रे? मुलगा जरा नवखा वाटला त्यान ए........??? एवढीच प्रतिक्रिया दिली; यावर ती जीनवाली हसून म्हणते कशी... आमच्या पुण्यात असच म्हणतात; आता एखादी मुलगी तुझी फ्रेंड असेल तर ती तुझी गर्लफ्रेंडच झाली ना?, त्यात लाजायचं काय एवढ??मी परत मनात म्हटल जमतंय वाटत आता.
       आयला या आजकाल च्या कॉलजच्या पोरा-पोरींची गमाजाच हाय बाबा; तुमाला सांगतो आमचा एक एक्स पार्टनर, गावाकडन शिकायालाच पुण्यात आलेला; इथे आल्यावर तेलाबी तसच काहीतरी कराव वाटायला लागलं; मग काय तेनबी कुठल्यातरी क्लासमध्ये टाकल जमवून. २-३ वर्ष झाली हा नोकरीत चांगला स्थिर-स्थावर झाला, तीचपण शिक्षण-बिक्षण पूर्ण झाल, पण जात वेगवेगळी असल्यामुळ लग्न होणार नाही याची दोघानाही पूर्ण कल्पना,  तरीदेखील गाठी-भेटी, ट्रीपा मात्र नित्य-नेमान चालूच, एवढी हाईट कि गडी एक नंबर, दोन नंबर कुठही गेला तरी मोबाईल बरोबरच, हेंच्या रातभर चालणाऱ्या sms च्या टिंव टिंव मुळ च्यायला माझ्या झोपेच खोबरं व्हायच.
     असा सगळा विचार करत करत रूम वर आलो, संध्याकाळी जरा निवांत टीव्ही बघत बसावं म्हटल; UTV, HBO वाले शौकीन मेम्बर नसल्यामुळ मी झी-मराठी लावायचं धाडस केल. कुठलीतरी सिरायल चालू होती माझिया प्रियाला प्रीत कळेना का काय ती (आयला या सिरीयालिनी तरी काव आणलाय राव अक्षरश:) त्यात ती तिरळ्या डोळ्यांची नटी आपल्या आजीच्या गळ्यात पडपडून रडत होती मी टिम्ब टिम्ब शिवाय जगू नाही शकत ग!!! खरच नाही जगू शकत
        आत्ता मात्र अगदी हाईट झाली राव; बघाव तिकड सगळीकड हेच? मग मला असं वाटू लागलं बहुतेक पोराला गर्लफ्रेंड आणि पोरीला बॉयफ्रेंड असण हे आजकाल अन्न, वस्त्र, निवारा यांच्या इतकच गरजेच झालेल असाव. त्याशिवाय का वय, शिक्षण, जात, धर्म, आई-बाप, भाऊ-बहिण, देश, समाज, परंपरा, चाली-रिती कशा-कशाचा म्हणून विचार न करता प्रत्येक जण सोसायटी नाहीतर कॉलनी नाहीतर क्लास, कॉलेज, इंटरनेट इतकच काय पण जमल तर जाता येता बस मध्येही जास्त नाही पण एखाद्या ठिकाणी तरी जमवतोयच.
        काही लोकांना हे आवडत; काहीना आवडत नाही. काही लोक याबद्दल भाषणे देतात, मनसेवाले लोक सटके देतात. सेनावाले आणखीन काही तरी करतात; ज्यांचा त्यांचा दृष्टीकोन. पण जमवणारे काही दमत ही नाहीत अन संपतहि नाहीत; सगळ्यात शेवटी माझा आपला एक प्रश्न फक्त क्युरॉसिटी म्हणून ..........................
बकिच जाऊ दे; पण या सगळ्या जमवणारया मंडळींच पुढे होत तरी काय??? काय मंडळी तुमचा काय अनुभव???

2 comments:

  1. Mala to mitra mahit aahe bahutek....He will get married soon with someone else....

    ReplyDelete
  2. He he he......
    hi Sagar you got it right......... ;)

    ReplyDelete