Wednesday, 12 January 2011

आणि हे काय???

जिंकायला काय प्रमाण??????

काय सांगायच तुम्हाला; मंडळी आपल्या ब्लॉग ने आज व्हिजिटर्स च शतक पूर्ण केल आणि ते पण फ़क्त ७ दिवसात !!!!! व्हिजिट्स तरी कुठन कुठन म्हणता, भारत म्हणू नका, तुमचा त्यो इंग्लंड म्हणू नका, अमेरिका म्हणू नका, अगदी ओमान, ईजिप्त, मलेशिया मधन सुद्धा व्हिजिट मिळाल्या.

खरच भावानो (आणि बहिणींनो म्हणाव का नाही याचा अजून विचार चाललाय...... अजून काय ठरल नाही पण यंदाच्या वर्षात सांगतो नक्की) तुमच्या उदंड प्रतिसादा बद्दल खरच तुमच मनापस्न आभार.


हे सगळ अजून आपला ब्लॉग मराठी ब्लॉग विश्व वर समाविष्ट झाला नसताना सुध्धा; खरच हे सगळ फक्त तुमच्यामूळच.  असच प्रेम  राहून  दे आपल्या ब्लॉगवर; आधन-मधन कधी तरी एखादी भेट नक्की देत जावा; आपलाच ब्लॉग हाय.

आणि हो तुम्हाला कधी काय बी सांगाव वाटल; कधी काय कमी जास्त वाटल तर बिनधास्त सांगायच; लाजायच नाही आजिबात.  पब्लिकमधी सांगायच नसल तर खाजगीत पण चालल tumacha.assalkolhapuri@gmail.com वर.
काय हाय; ब्लॉग जरी माझा असला तरी नाव शेवटी आपल्या कोल्हापूरचच लावतोय ना?
त्यामुळ कोल्हापूरच्या नावाला शोभलसाच ब्लॉग झाला पाहिजे ........काय ?

निरोप घेतो.
हो एक सांगायचच राहिल.  बर का मंडळी !! लवकरच आपला ब्लॉग आता आपल्या स्वता:च्या पत्त्यावर दिसणार आहे....... म्हणजे??? आहो www.assalkolhapuri.com वर. म्हणजे कस तुमाला लक्षात ठेवायला बर.
तवा अगदी हक्कान आपल्या ब्लॉगला व्हिजिट द्याची.

बराय मग भेटू परत.

चूक भूल, देणे घेणे.

No comments:

Post a comment