रात्री ९-९:३० ची वेळ, पुणे स्टेशन वरून बसने विमान नगरला चाललो होतो. १ ऑगस्ट, फ्रेंडशिप डे; त्यामुळे बसला बर्यापैकी गर्दी होती. नुकतेच पंख फुटलेले आणि नवीन फ्रेंड्स मिळालेले अनेक पक्षी बसमध्ये चिवचिवत होते. बस चालू होऊन ५-१० मिनिट झाली असतील, एका स्टौपवर तीन गुज्जू पोर एका चिमणीला घेऊन बस मध्ये चढली. माझ्या मागच्याच सीटवर एक जागा रिकामी झाली होती. त्या तिघांपैकी एकाने पळत पळत येऊन ती जागा पकडली, अर्थात 'चिमणी'साठी.
मग त्यांच्या एअर bags , hand bags अशी बरीच पोतडी माझ्या आजूबाजूला जमा झाली. मी कसाबसा आपला अंग चोरून बसलो, त्यात भर म्हणून आता त्यांची ती 'करू च्छे' 'जाऊ च्छे' 'खाऊ च्छे' ची पीरपीर चालू झाली. मनातल्या मनात म्हटलं एsss आयला तुमची घाला कि तिकडं लांब जाऊन कुठतरी, इथ माझ्या डोक्याची XXX का करालाय?
पण मग काहीच पर्याय नसल्यामुळे तिकड दुर्लक्ष करून पक्षी निरीक्षण करू लागलो; कसच काय हीच आपली चांडाळ चौकडी आजूबाजूला, त्यातलाच एक जण बगळयासारखी मान असलेला काडी पैलवान; आपला जाड भिंगाचा चष्मा सांभाळत हाफ चड्डीवरच आला होता. त्याला ती माझ्या मागच्या सीटवर बसलेली चिमणी काहीतरी लेक्चर देत होती. दुसरा एकजण याच्या एकदम ऑपोझीट; गोल गरगरीत आणि तिसरा तसा मापातला पण ढापणा; तो त्या भोपळ्याला पटवून देत होता कि बसमुळे त्यांचे किती पैसे वाचले; नाहीतर इथल्या रिक्षावाल्यांनी त्यांना कस लुटलं असतं; त्याच्याच शब्दात सांगायचं झाल तर "These autowalas would have mugged us for at least 300, छी!!! I hate these beggers" Beggers???? आयला ह्यांच्यामुळ तर इथ महागाई वाढलीया आणि वर चोरांच्या उलट्या बोंबा.
मग हळूहळू त्यांचा विषय इथल्या गर्दीवर आणि घाणीवर घसरला; म्हणजे मी तसं ते त्यांच्या "करू च्छे" "खाऊ च्छे" वरून गेस केल. मधेच काहीतरी झाल आणि एकदमच तो ढापण्या म्हणाला
"This is Fuckin Crowdy Place............"
मी एकदम चमकून त्याच्याकडे खुन्नस देऊन बघितलं, तसं तो वरमला; समजायचं ते समजला आणि थोडासा बाजूला सरकून खिडकीबाहेर बघत उभा राहिला.
आयला म्हणजे हे बर हाय; आपलं घर गाव नसल्या सारख इथ यायच, इथंच घाण करायची, गर्दी करायची, महागाई वाढवायची आणि वर हीच "Fuckin Crowdy Place" अरे मग इथ कशाला येताय आई घालायला?
एवढ्यात माझा stop आला, उतरताना मी मुद्दामच त्या बगळ्याच्या पायावर एवढ्या जोरात पाय दिला कि बीचार अगदी कळवळल, मी म्हटलं बसू दे बोंबलत.......
Jinklas!! Navin varshachi mast suruvat keli aahes
ReplyDelete1 Number !!! Kharach Jinklat Raje !!
ReplyDeleteYuvarya bhava agadi manatale bolalas..
ReplyDeleteNaad khula..