Thursday, 12 May 2011

हे आंदोलन-बिंदोलन राहू दे बाजूला आधी लग्न करा


 
मागच्याच आठवड्यात इंग्लंडच्या युवराजाच लग्न अगदी थाटामाटात पार पडलं; आख्खं लंडन रस्त्यावर उतरलं होत. टीवी वर त्या लग्नाच्या बातम्या झळकताना बघून मनांत सारखा एकच प्रश्न घोळत होता; आपल्याला असा दिवस कधी बघायला मिळणार?

आता नाही म्हणलं तरी तुमी आमच्या देशाचे युवराजच. त्यामुळ आमच्या सगळ्या आशा आता तुमच्यावरच आहेत. आमच्या देशाला काँग्रेस शिवाय आणि कॉंग्रेसला तुमच्या शिवाय हाय तरी कोण? आता तुमीच सांगा गेली साठ वर्षे तुमच्या ४-५ पिढ्या या देशावर राज्य करत आहेत; ते काय उगीच? मग भलेही त्याला पार बोफोर्स पासून कालच्या तुमच्या त्या २G पर्यंतची परंपरा असेना का; या देशातील जनता कधी तरी तुमच्या विरुध्द पेटून उठलिय का? हां; आता ४-५ राज्यात दुसऱ्या पक्षाच सरकार येत असेल हि पण केंद्रात तरी तुमाला सध्या तरी काय पर्याय नाही.

काही झाल तरी तुमच्या त्या खट्याळ नाठाळ काँग्रेसजनांना ताळ्यावर आणायला कुणीतरी गांधीच लागतोय. आता हेच बघा कि आम्ही एवढी मोठी मोठी माणस निवडून दिली; मंत्री-बिन्त्री केली पण ती सुध्धा तुमच्या पायताणाजवळ उभारत्यात; न्हव तुमच पायताण हातात घेऊन उभारत्यात. किती राव तुमच मोठ्पण!!
त्यामुळ काय बी होऊदे, तूमी काय बी काळजी करू नका; आमची गांधी घराण्यावरची निष्ठा आजिबात ढळणार नाही; भलेही मग आम्हाला आमच्याच देशात आमचाच तिरंगा फडकवल्या बद्दल गोळ्या खाव्या लागल्या तरी चालतील, किंवा मग महागाईन आमच कंबरड मोडलं तरी हरकत नाही आमचा फक्त आणि फक्त तुमच्यावरच विश्वास आहे.

आता तुमी चाळीशीत पोचला; आमच्या पिढीच एक ठीक आहे पण आमच्या पुढच्या पिढ्यांच आणि भारताचं कसं होणार? त्यावेळी देश चालवायला (नव्हे देशावर राज्य करायला) कुणी गांधी नको का? त्याची सोय आत्ताचं नको का करायला?

म्हणून म्हणतो आता हे आंदोलन-बिंदोलन राहू दे बाजूला स्वत:साठी नाही तरी निदान देशासाठी तरी आधी लग्न करा.

1 comment:

  1. आमच्या युवराजांच नवीन-नवीन लग्नाचं वय तसं जवळपास निघून गेलंय,पण तरी हि त्यांनी आता कुठे तरी उगीचच नाव-बिव नोंदवण्या ऐवजी ते जर डायरेक्ट गोंदवले,म्हणजे अगदी कपाळा-बिपाळा वर नव्हे तर हाता वर वगैरे तर अजून हि स्कोप आहे.नाव नोंदवायच जरी गेलं असाल तरी गोंदवायचं त्यांचं वय अजून नक्कीच आहे:)) आमची हि अभिनव कल्पना ते केवळ भारतमातेचे युवराज असल्यानेच जर युवराजां पर्यंत पोहचविता आली तर प्लीज बघा नां ?

    ReplyDelete