
मध्यंतरी अस्मादिकांच्या लग्नासाठी आमच्या घरासमोर मांडव घातला होता; आणि मग काय गाणी-बजावणी हेहि आलच. आता मांडव, त्याला लायटिंग, आणि स्टेरिओवर गाणी त्यामुळं दररोज संध्याकाळी गल्लीतली सगळी शेंबडी पोरं आमच्या घरासमोर मांडवात नुसता धुडगूस घालायची. असच एक दिवस संध्याकाळी आमचे वडील पाहुण्यांच्या सोबत गप्पा मारत मांडवात बसले होते; नेहमीप्रमाणे गल्लीतल्या सगळ्या शेंबड्या पोरांनी स्टेरिओवरच्या गाण्यांच्यावर गणपती डान्स चालू केला होता. अशीच २-४ गाणी झाली असतील. सगळेजण त्या लहान पोरांचा निरागस दंगा अगदी कौतुकाने पाहत होते. एवढ्यात काय झाल गर्दीतन ३-४ वर्षांची दोन पोरं आमच्या वडिलांच्या जवळ आली; आणि म्हणतात काशी
“अहो काका कसली गाणी लावलाय हि??? शीलाकी जवानी लावा कि जरा .......”
आता ह्यास्नी स्वतःची XXX धुवायची अजून अक्कल नाही आणि ह्यास्नी ‘शीलाकी जवानी’ पाहिजे. ह्याला काय म्हणावं आता तुमीच सांगा.
या प्रसंगाला १०-१२ दिवस झाले असतील नसतील; आमची सुट्टी अजून संपली नसल्यामुळ आम्ही कोल्हापुरातच होतो. आमच्या घरासमोर एक एकत्र कुटुंब आहे.
तिथलाच एक ५-६ वर्षाचा चुणचुणीत मुलगा; एक दिवस घरासमोरच्या रस्त्यावर मोठ-मोठ्यांनी गाणी म्हणत उभा होता
“जाने दे शीला...... शीला कि जवानी.... आयम टू सेक्सी फॉर यु.......”
एवढ्यात त्याची आई आतून आली आणि असले काय २-३ धप्पाटे त्याच्या पाठीत घातले म्हणता.... ते बिचार लागलं बोंबलायला. मला पण कळेना हेच्या आईला एवढं रागवायला नेमक काय झालं .......
आणि मग थोड्यावेळान लक्षात आलं त्या मुलाच्या आईचं नावच ‘शीला’ होतं.
मस्त झाला आहे लेख...
ReplyDelete