Wednesday, 25 May 2011

‘सकाळ’ भारी का ‘पुढारी’?

मागच्याच आठवड्यात दै. सकाळ मध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली कोल्हापुरात खपात 'सकाळ' नंबर वन  लगेच दुसरयाच दिवाशी दै. पुढारीने पण इंडियन रिडरशिप सर्वेचा दाखला देत प्रत्त्युत्तर केलं दुपटीहून अधिक वाचकसंख्येने पुढारीच्या निर्विवाद वर्चस्वावर पुन्हा शिक्का मोर्तब


खरं तर या सगळ्याला सुरवात तशी वर्षा-दीड वर्षापासूनच झालीय. मला वाटतंय पुढारीने जेव्हा पासून पुण्यात पाय रोवायला सुरवात केली, तेव्हापासून या वादाला तोंड फुटत गेलं. कदाचित आपण सगळ्यांनी हे ऑब्सर्व केलच असेल; पुढारीने ज्यावेळी पुणे आवृत्ती चालू केली त्यावेळी त्यांची जाहिरातच काहीशी अशी होती

आता सकाळचं पाहिलं काम पुढारी वाचायचं!!!; पी एम टी च्या अनेक बसेसवर हि जाहीरात त्यावेळी झळकत होती. आता पुढारीने अशी जाहीर कुरापत काढल्यावर सकाळ कसं गप्प बसेल?


त्यांनी मग कोल्हापूर आवृत्तीचे दर बिझनेस पोलीसी च्या नावाखाली कमी केले आणि मग मिडिया वॉर पेटलं; जवळपास आठवडा भर कोल्हापुरात हे धुमशान चालू होतं. पुढारीने विक्रेत्यांना मिळणाऱ्या कमिशनचा मुद्दा हाताशी धरून वृत्तपत्र विक्रेत्या संघटनेला आपल्या बाजूने केलं; आणि मग काही वृत्तपत्र विक्रेत्यानी दै. सकाळ वर बहिष्कार टाकला.

दै. सकाळने हि मग माघार न घेता वितरणाची समांतर यंत्रणाच उभी केली. प्रथम नाव न घेता होत असलेल्या टीका नंतर वयक्तिक पातळीवर होऊ लागल्या. याचाच परिपाक म्हणून सकाळ कोल्हापूर आवृत्ती चे संपादक पद दस्तूर खुद्द अभिजीत पवारांकडे आले.

त्यांनी हातात कारभार घेतल्या-घेतल्या कोल्हापूरला विकासाच्या पहाटेची स्वप्न दाखवली. पण अजुनहि कोल्हापूरकर पहाटेची स्वप्न खरी होतात या गोष्टीवरच विश्वास ठेवून त्या विकासाची वाट पहात आहेत.

 
वास्तविक पाहता या वादाचा इतिहास फार जुना; मला वाटतं जेव्हा पासून दै. सकाळ न कोल्हापुरात पाय ठेवला तेव्हांपासून या वादाची ठिणगी पडली असावी, त्याच्या अगोदर दै. पुढारीची आणि त्यांच्या परीवाराचीच (सुज्ञ वाचकांना हा टोमणा निश्चितच समाजाला असावा) कोल्हापुरात मोनोपोली होती; त्याला सकाळने दिलेले आव्हान पुढारीला आवडले नसावे त्यामुळेच पुढारीचा पवारद्वेष आणि पर्यायाने राष्ट्रवादी द्वेष जन्माला आला.


पुढे काय झालं माहित नाही; पण साधारण ८-१० दिवसांनी तो वाद बहुधा थंड झाला. लोकांचे फुकट मनोरंजन करण्यापलीकडे यातून काही साध्य झालं असेल असं काही मला वाटत नाही. पण तब्बल एक-दीड वर्षांनी परत ह्या सध्याच्या बातम्यांनी हेच दाखवून दिले कि वाद जरी वरवर थंड झाला असला तरी आत कुठेतरी अजून ठिणगी धुमसते आहे.


आता पुढारी आणि सकाळ यात तुलना करायचीच झाली तर दोन्ही दैनिक वर्तमान पत्रे आहेत (आता सकाळ ने स्वयं घोषित भविष्य पत्राचा उदय केलाय हा भाग सोडून दया) हा एक मुद्दा सोडला तर साम्य असे काही नाहीच.

सकाळ खरे तर ब्राम्हणी ढंगाचे पुणेरी दैनिक; सौम्य भाषेतून आशयपूर्ण आणि सृजनशील लिखाण बुद्धीजीवी लोकांपर्यंत पोहोचवण्याची परंपरा असलेले; तर पुढारी म्हणजे अस्सल कोल्हापूरी चटपटीत भाषेत लोकांचे मनोरंजन करणारे दैनिक. दोन्ही दैनिकांचा वाचक वर्ग पूर्ण वेगळा पण तरीही त्यांच्या मधील हि इर्षा खरच अनाकलनीय आहे.

जाऊ दे आपल्याला काय करायचाय आपण तरी सकाळ आणि पुढारी दोन्ही पेपर रोज वाचतो तेहि इंटरनेट वर अगदी फुकटात; काय?  

           

6 comments:

 1. "पुढाऱ्य़ांची सकाळ" रात्रीच होते आणि "सकाळचा पुढारी" संध्याकाळी भिंतीला तुंबड्या लावत असतो असे काहीये चित्र वाटते ह्यावर आपले काय मत आहे ते सत्यवादीकारांच्या भाषेत एकदा सांगा म्हणजे झाले...

  ReplyDelete
 2. Sagar Nanivadekar25 May 2011 at 15:24

  mast re..perfect pakadalas. saddhya hech chalu ahe ..ugich.
  Apalyala kay..milatay te vachaych ani maja baghayachi :D

  ReplyDelete
 3. pudhri bahri karan pudhri paper read kelya shiya mala divas jat nahi ...........

  ReplyDelete
 4. गौरव,
  लेख छान झालाय.
  दै."सकाळ"चे संस्थापक कै.ना भि. परुळेकर असतानाचा "सकाळ" नि आत्ताचा "सकाळ" ह्यात अगदी "नाभी"(बेंबी) पासून फरक झालाय हे फक्त "सकाळ"चे नियमित वाचकच आपल्याला सांगू शकतील.तसे पहिले तर परुळेकर असतानाचा खरोखरचा निःपक्ष ,निर्भीड वृत्तपत्र हा "सकाळ"चा असलेला नावलौकिक केव्हाच गेलाय.दै."सकाळ" ,पवार ग्रुपच्या मालकीचे झाल्या नंतर, स्थानिक व राज्यस्तरीय निवडणूक काळात,स्वाभाविकपणे पवार धार्जिणा बनतो ,त्या दिशेला झुकतो हि वास्तवता नि कटू सत्य आहे.तथापि सकाळच्या नियमित पुणेकर वाचकांनी हे कटू सत्य, वास्तवता अपरिहार्यपणे गृहीत धरलेली असल्याने आणि "त्या काळात" त्यास कमी महत्व देण्याचे धोरण अंमलात आणल्याने त्याचा तसा त्रास नाही, तसेच निवडणुका वगळता इतर काळात जास्तीत जास्त निःपक्ष वृत्तांकन करण्याचे सकाळचे जुने धोरण ,पवार ग्रुपने अजून तरी त्यातल्या त्यात राबविल्या मुळे सध्या तरी अजून, निदान पुण्यात तरी त्याचे नं.एकचे स्थान अबाधित आहे.
  "गाव तशी भाषा" ह्या उक्तीला धरून दै.पुढारी हा कोल्हापूरचे पुढारीपण जर मिरवीत असेल तर ,खरे तर त्यात काहीच आश्चर्य वाटायला नकोय,तथापि शहरीकरणाच्या,काळाच्या ओघात दै. सकाळने तेथे जर बाजी मारली असेल तर ते "सकाळ" चे मोठे पण अथवा पुढारीचे खुजे पण नसून कोल्हापूर बदलत गेल्याचे प्रतिक आहे किंवा कोल्हापुरी तांबड्या पांढऱ्या रश्याचे हळू हळू अळूच्या भाजीत परिवर्तन होत चालल्याचे ते लक्षण आहे.
  थोडक्यात काय तर सकाळचा सॉफिस्टीकेटेड फॉंट,किंवा पुढारीचा "ठसकेबाज छाप" हा काळाच्या ओघात " सॉफिस्टीकेटेड ठसके फॉंट "च्या रुपात येऊन पुढच्या पिढ्या नवे वृत्तपत्रीय युद्ध अनुभवातील ह्यात शंका नाही.

  ReplyDelete
 5. pudhari paper attractive ahe. vachnyasathi sakal peksh bhari ahe.

  ReplyDelete