लहानपणी
जेवढी एखाद्या सणाबद्दल उत्सुकता असायची किंवा एकूणच जेवढी मज्जा यायची तेवढी आता वाटत
नाही. तुम्हाला सुध्धा असच वाटत का?
हे
अस कशामुळं असाव? मोठ झालं की आपल्या जाणीवा बोथट होतात म्हणून? की आताशा प्रत्येक
सणाला शाळेमधल्या सारखी सुट्टी मिळत नाही म्हणून? हे ही एक कारण असावच बहुतेक; कारण
बाकी काही नसलं तरी एखाद्या सणाला सुट्टी असेल तर निदान त्या सणाचा फील तरी येत राहतो.
पण
एकूणच पाहिलं तरी पूर्वीच्या काळी सणांचे जेवढे महत्व असायचे तेवढे आताशा नक्कीच राहिलेलं
नाही. कारण पूर्वीच्या काळी माणूस निसर्गाच्या फार जवळ होता, त्यामुळ रंगपंचमी, पाणीपंचमी
यांच्यामुळे शरीराला मिळणारा गारवा त्यावेळी आवश्यक असायचा, आता सगळा दिवस ऑफिसच्या
ए. सी. मध्ये बसणाऱ्याला अशा गारव्याची काय गरज. तसच काहीस दिवाळी, संक्रात यासारख्या
सणांचं. तुम्ही सांगा आज-काल फक्त दिवाळीलाच केल्या जाणाऱ्या फराळाच कुणाला काही अप्रूप
राहिलय का?
दिवाळीचा
फराळ बनवण हे सुध्धा पूर्वी किती थ्रिलिंग असायचं, डाळी, तांदूळ दळून आणण्यापासून तयारी
असायची. आताशा घरच्या बायकादेखील एवढं लक्ष देताना दिसतात या गोष्टीत.
एकूण
काय आज-काल सणांचे धार्मिक म्हणा, वैज्ञानिक म्हणा नाहीतर सांस्कृतिक, सामाजिक काही
म्हणा असले काही उद्देश सोडून निव्वळ सेलिब्रेशन हा एकमेव उद्देश राहिलेला आहे हे आपल्याला
मान्य करावेच लागेल.
पण
तरीसुध्धा सेलिब्रेशनच्या निमित्ताने का होईना आपण थोड्याफार चालीरीती जपतो, त्यामळे
परंपरा जपली जाते, कालौघात सणांचे पूर्वीचे उद्देश जरी पुसले जात असले तरी हे सण पूर्वी
का साजरे केले जात होते निदान हे तरी आपल्या लक्षात राहील.
आणि
म्हणूनच म्हणतो चला लेट्स सेलिब्रेट !!!! “HAPPY HOLI…. ”
No comments:
Post a comment